Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांची वारीमध्ये स्वच्छता मोहीम
गोयल गंगा फाउंडेशनचा उपक्रम

पुणे :  पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली;तसेच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक बंदी याबद्दल जनजागृती केली. गोयल गंगा फाउंडेशनतर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

 

गेल्या चार वर्षांपासून वारीच्या काळात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचे नववी ते बारावीचे विद्यार्थी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासोबत काम करतात. या वेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. वारीच्या आठवणी कायमस्वरूपी जतन केल्या जाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटरी करण्याचे ठरवले असून, त्यासाठी त्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. चित्रीकरण केले आणि छायाचित्रेही घेतली.


या वेळी सोनू गुप्ता म्हणाल्या, ‘वारीची परंपरा फक्त एकमेकांना जोडत नाही, तर ती आपल्या मुळांना एकत्र ठेवते. वारीमधून माणुसकीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडत असते. हा अनुभव नव्या पिढीने घ्यावा, या हाच या उपक्रमागचा हेतू आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZHHCB
Similar Posts
‘क्रेडाई’तर्फे वारकऱ्यांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप पिंपरी-चिंचवड : ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ संघटनेच्या बांधकाम व्यावसायिकांनी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना तब्बल अडीच हजार प्रथमोपचार पेट्यांचे वाटप केले. निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात हा कार्यक्रम झाला.
'रीजनल आउटरीच ब्यूरो'द्वारे २९ शहरांत महास्वच्छता उपक्रम पुणे : स्वच्छ भारत अभियान एक कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र रीजनल आउटरीच ब्युरो व गोवा क्षेत्रीय मुख्यालयाने महास्वच्छता अभियान कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘त्यांना’ घडली ‘मर्सिडीज’मधून सफर... पुणे : जगातील सर्वांत दिग्गज कंपनीची आलिशान अशी चकचकीत, लांबलचक कार मुलांसमोर उभी होती. काय बघू आणि काय नको असे त्यांना झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आलिशान ‘मर्सिडीज बेंझ’मध्ये बसून त्यांना फेरीही मारायची होती. लाइफस्कूल फाउंडेशनच्या ‘कीप मूव्हिंग मूव्हमेंट’ उपक्रमांतर्गत नुकतेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language